अंबेघर गावातील तीन कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या २४ तासांत पावसाने पाटण तालुक्यात हाहाकार माजविला असून, पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे गुरवारी मध्यरात्री गावावर दरड कोसळली. गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तीन कुटुंबे बेपत्ता झाली आहेत.

पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदींसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी ढासळल्या आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून व पाण्याखाली गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणादेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफच्या टीमला या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे.दरम्यान, पाटण तालुक्यातील टोळेवाडीकडे जाणाऱ्या मार्गालगत असणारी दरड कोसळली आहे. ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

error: Content is protected !!