अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी विशेष लंगर सेवा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी विशेष लंगर सेवा उपक्रम वाई येथे राबविण्यात आला. श्रीनिवास पाटील फाऊंडेशन, गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा पुणे, सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व पुणे, सातारा जिल्ह्यातील इतर सेवाभावी संस्थांच्यावतीने हे मदतकार्य केले जात आहे.

जोर (ता.वाई) व परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्‍या गावांना तयार भोजन व जीवनावश्यक साहित्याच्या किटचे राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्यावतीने वाटप करण्यात आले. तसेच वाई येथे विशेष लंगर सेवा सुरू करण्यात आली. त्यासाठी सर्व सहकाऱ्यांनी सकाळपासूनच जेवण तयार केले. साहित्य किट स्वरूपात बांधून घेऊन वाई येथून दिड तासाचा प्रवास करून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त ठिकाणी जावून त्याचे वितरण केले. यानुसार ही लंगर सेवा व साहित्याचे वाटप पुढील आणखी काही दिवस कसे सुरू ठेवता येईल याचे नियोजनही करण्यात आले.

error: Content is protected !!