सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाच्या वसाहतीमधून बॅटऱ्यांची चोरी करुन तिची विक्री करण्यास निघालेल्या चोरट्यांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ४,४०,००० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या सुचना प्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना
प्रतापसिंहनगर, सातारा येथून बॉम्बे रेस्टॉरंट बाजूकडे पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्याचा साथिदार हे छोटा हत्ती (क्र. एम.एच.११ सी.एच.५६७४) मधून जलसंपदा विभाग वसाहत कृष्णानगर सातारा येथून चोरलेल्या बॅटया विक्रीसाठी घेवून चालले आहेत.
त्या अनुशंगाने पथकाने बॉम्बे रेस्टॉरन्ट परिसरामध्ये थांबून सापळा लावला. १९.१०
वा.चे.सुमारास प्राप्त झाले बातमीमधील वाहन कोरेगाव बाजूकडून सातारा बाजूकडे येताना दिसले. त्यास थांबवून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये ८ बॅटऱ्या आढळून आल्या. त्यामधील पोलीस
अभिलेखावरील आरोपी व त्याचा साथिदार यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरच्या बॅटर्या
कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाचे गोडावून मधून चोरल्या असून त्या विक्री करण्याकरीता घेवून जात असल्याचे सांगीतले. घरफोडीचा चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून ४,४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
You must be logged in to post a comment.