बिबट्याने कुत्र्याला मारून चक्क झाडावर लटकवले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – कराड तालुक्यातील मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. गुरुवारी रात्री विंग परिसरातील शिंदेवाडी येथे बिबट्याने कुत्र्याला ठार मारून चक्क झाडावर लटवले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिंदेवाडी परिसरात बिबट्याचा मागील काही दिवसांपासून वावर वाढला असून त्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. गुरुवारी रात्री बिबट्याने शिवाजी शिंदे यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. त्यानंतर त्याला फरपडत घेऊन जांभळीच्या झाडावर लटकवला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा माघ काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

error: Content is protected !!