सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मस्करवाडी (ता. कराड) येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या मादी ही पिल्लां सोबत होती. त्यामुळे तिने अचानक हल्ला केला. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय कराड येथे येथे दाखल करण्यात आले आहे.
ही घटना आज ( दि. १७ ) सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. वनरक्षक ए.एम.जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय ५५, रा. मस्करवाडी, तालुका कराड) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सूर्यवंशी हे सकाळी नऊ वाजण्याच्या माऊली कडी नावाच्या शिवारात जनावरांसाठी वैरण आणण्यास गेले होते. कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बिबट्या होता. त्याने अचानक सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला.
.
You must be logged in to post a comment.