सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कराड तालुक्यातील बेलवडे येथील एका उसाच्या शेतामध्ये बुधवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
कराड तालुक्यातील बेलवडे परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. त्याने शेती शिवारात असलेल्या जनावरांना लक्ष केले होते. परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
आज सकाळी भिलवडीतील शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेला असता, परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्या शेतकऱ्यांने घटनास्थळी जाऊन पाहिले असता बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे.
You must be logged in to post a comment.