५४ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावू :आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पला पाणी आरक्षण मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु असून अधिवेशनात धरणे आंदोलनही केले. आगामी काळात शासनस्तरावर पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीत बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावू अशा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी  बोंडारवाडी धरण निर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. 

जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागला पाहिजे यासाठी ५४ गावातील ग्रामस्थांनी बोंडारवाडी धरण निर्माण समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन  बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावावा अशी आग्रही मागणी केली. त्यावेळी जावली – सातारा विधानसभा मतदारसंघ माजी अध्यक्ष रामभाऊ शेलार, जेष्ठ नेते मोहनराव कासुर्डे, जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना रांजणे, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, कांताताई सुतार, प्रवीण महाराज शेलार, केळघरचे माजी सरपंच बबन बेलोशे, आंबेघरचे उपसरपंच हरिभाऊ शेलार, सागर धनावडे, मोहाटचे सरपंच विलास धनावडे, अंकुश बेलोशे, बाळासाहेब ओंबळे, केडंबेचे सरपंच महादेव ओंबळे, श्रीरंग पाडळे, किसन देसाई, वरोशीचे सरपंच विलास शिर्के, पुनवडीचे सरपंच सुरेश पार्टे, गवडीचे सरपंच राजू खुडे, म्हाते खुर्दचे सरपंच राजाराम दळवी,  कुसूंबीचे सरपंच जगन्नाथ चिकणे, मामुर्डीचे सरपंच बजरंग चौधरी, दिवदेवचे जी.दि. जुनघरे, केडंबेचे गणपत ओंबळे, शशिकांत शेलार, नारायण पार्टे, विश्वास जुनघरे, विजय सपकाळ, नामदेव धनावडे, शाम धनावडे, विजय दळवी, प्रकाश ओंबळे, सुभाष शेलार, शिवाजी गोरे, सुरेश कासुर्डे यांच्यासह काळोशी, निझरे, करंजे, आंबेघर, आसनी गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. महिनाभरात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ना. पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातूनच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास  बोंडारवाडी धरण निर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. 

error: Content is protected !!