सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले. काहींनी तर आपले बलिदान गेले. असा हा लढा आजतगायत सूरु आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्नी मा.पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकरिता कराड तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत #letter To PM या मथळ्याखाली पत्र मोहिम राबवत उस्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे ५०० पत्रे मा.पंतप्रधानांना पाठवली.
“सीमाप्रश्न मार्गी लावून ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा.” आशा भावना तरुण तरुणीनी व्यक्त केल्या व कराड तालुक्याच्या वतीने सीमावासीयांना पाठिंबा दर्शविला. तसेच यावेळी सीमावासियांना पाठिंबा दर्शविताना, “आपल्यातील गटतट, पक्षीय मतभेद विसरून फुटीरता नष्ट करून सर्वांनी एकत्र यावे व एकजुटीने हा लढा लढवा. जेवढी आपली एकजूट मजबूत असेल तेवढ्या लवकर बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची सुवर्णं पहाट उजाडेल” असे अवाहन वैष्णव काशीद पाटील यांनी सीमावासियांना केले.
यावेळी वैष्णव काशीद पाटील, धैर्यशील कदम, समर्थ सूर्यवंशी,संकेत कचरे, यश अतकरे, आदिती देशमुख,वैष्णवी जाधव, पल्लवी जायभाये, वैष्णवी सर्वज्ञ यांनी पत्र मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामगिरी बजावली.
You must be logged in to post a comment.