नविआच्या नगरसेविकेची गांधीगिरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या विषयपत्रिकेत नगरसेविका लिना गोरे यांच्या प्रभागातील विकास कामे न घेतल्याने सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांना गुलाब देऊन विषय पत्रिकेमध्ये प्रभागातील विकासकामे घ्यावीत असे निवेदन दिले.

गोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. २० मधील काही विकासकामे दि. २६ जुलै रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत नमुद केली होती. मात्र, कोरम अभावी ही बैठक रद्द झाली. त्यानंतर २७ आँगस्ट रोजी ही बैठक होणार आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या विषय पत्रिकेत प्रभाग क्र. २० मधील विकासकामे वगळण्यात आली आहेत. हा प्रकार राजकीय हेतूने केला असून त्यामुळे सातारा शहरात राहणाऱ्या लोकांवर अन्याय झाला आहे. यास नगराध्यक्षा जबाबदार असून त्यांनी माझ्या प्रभागातील विषय स्थायी समितीच्या बैठकीत घ्यावे. अन्यथा पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!