आलिशान कारमधुन अवैध दारू वाहतूक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लोणंद येथे आलिशान कारमधुन अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच लोणंद पोलिसांनी १५ लाखाच्या फॉच्यूनर गाडीसह ९३ हजार ४८० रुपयांचा माल जप्त करत तिघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की,  दि. २ रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत एका फॉच्यूनर गाडीतून अवैध्य दारू वाहतूक होत असल्याची माहिती लोणंद पोलीसांना मिळाली होती. तातडीने याबाबत कारवाई करत या गाडीचा पाठलाग करुन गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये  ३० देशी दारूचे बॉक्स व एक बीयरचा बॉक्स आढळून आला असून त्याची किंमत  ९३४८० रुपये आहे. यामध्ये अवैध दारु व पंधरा लाखाची गाडी जप्त करण्यात आली. कोरेगाव तालुक्यातील धीरज संजय बर्गे, आझाद चौक, मयुरेश हणमंत शिंदे रा. संभाजी नगर, योगेश उर्फ बाळासाहेब आनंदराव बर्गे रा. अजिंक्य कॉलनी यांना लोणंद पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गणेश माने, संतोष नाळे, अमोल अडसूळ, महेंद्र सपकाळ, आभिजीत घनवट, फैयाज शेख यांनी करवाईत सहभाग घेतला.

error: Content is protected !!