![](https://i0.wp.com/bhumishilp.com/wp-content/uploads/2021/01/truck.jpg?resize=316%2C400&ssl=1)
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटण-ढेबेवाडी रस्त्यावरून कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तब्बल सहाशे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाला कोणतीही इजा झालेली नाही. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, कराड तालुक्यात कराड -ढेबेवाडी रस्त्यावर टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती. कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील काढणे फाट्याजवळ हा टेम्पो आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटला. त्यामुळे टेम्पोत असलेल्या जवळपास सहाशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.
या अपघातात चालकाला कोणतीही इजा झाली नाही. घटनेची माहिती होताच शेतातील शेतकरी आणि इतर प्रवासी यांनी तत्काळ मदतकार्य केले. मात्र तब्बल सहाशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे मालकाचे लाखो रुपयांचे नुसकान झाल्याचे सांगितले जात आहे.
You must be logged in to post a comment.