बिबट्याने घेतला बालकाच्या नरडीचा घोट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला येणके, ता. कराड येथील उसाच्या शिवारात बिबट्यानं उचलून नेलं. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथेच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली. आकाश पावरा (वय 3) असं त्या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळं त्या परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली

error: Content is protected !!