सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात पुन्हा रुग्णवाढ होत असून तीन ते चार दिवसांपासून पंधराशेच्यावर रुग्णांची नोंद होत आहे. शासनाने १५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला. तरी अनेक जण विनाकारण घऱाच्या बाहेर पडत आहे. अशा २०० नागरिकांवर सातारा शहर व शाहुपूरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तर चार जणांची वाहने जप्त केली आहेत.
कोरोना केसेस वाढल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यभरात १५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराच्या बाहेर पडण्यास मनाई केली आहे. तरी लोक जीवनावश्यक वस्तू खरेदीचे कारण सांगून मोठ्या प्रमाणात बाहेर पडून गर्दी करीत आहेत. यासाठी सातारा शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली असून घऱाच्याबाहेर पडणाऱ्या लोकांची चौकशी केली जात होती. योग्य कारण न सांगणाऱ्या लोकांना दंडात्मक कारवाई केली जात आहे.
You must be logged in to post a comment.