सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात दि. २५ मे पासून आणखी कडक लाॅकडाऊन करण्यात आले असूनही कोरोनाचा उद्रेक होत आहे. दिवसभरात तब्बल 2675 नवे कोरोनाबाधित आढळून आले तर 33 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
You must be logged in to post a comment.