लॉकडाऊन 6.0 : पहिल्याच दिवशी 63 पॉझिटिव्ह !


एकाचा मृत्यू; कराड तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या ठरतेय डोकेदुखी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सहाव्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात जिल्ह्यात आणखी 63 पॉझिटिव्ह आढळून आले. यातले 22 रुग्ण एकट्या कराड तालुक्यातील आहेत. 27 जूनमध्ये याच तालुक्यात 28 रुग्ण आढळले होते. कराड तालुक्यातील ही रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.  बुधवारी पहाटे एका कोरोबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या 46 झाली आहे. दरम्यान, बुधवारी तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


जांभ येथील बाधिताचा मृत्यू
आज पहाटे कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील 33 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. तो कोरोनाबाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार  स्पष्ट झाले आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
कराड : महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील अनुक्रमे 22, 54, 32, 40, 35 वर्षीय महिला तसेच 11 वर्षीय युवक व 60 आणि 44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील 3 वर्षांची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, अनुक्रमे 23, 45, 70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 36 व 34 वर्षीय पुरुष आणि 18 वर्षीय युवती, पाटण : नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला आणि 4 वर्षांची बालिका, बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष, सातारा : नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष, माण : खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील अनुक्रमे 65, 50 व 27 वर्षीय पुरुष आणि 26 वर्षीय महिला व 11 वर्षांची मुलगी, खटाव : निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील 75 वर्षीय पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष, कोरेगाव : करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका, खंडाळा : शिरवळ येथील अनुक्रमे 22, 24, 32, 25 वर्षीय पुरुष तसेच अनुक्रमे 19, 49 व 75 वर्षीय महिला, फलटण : कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष, आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, जावली : मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष, वाई : चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, सह्याद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला, असे  63 कोरोनाबाधित आढळले आहेत. 

आणखी तीन जण कोरोनामुक्त
सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षांची युवती अशा तीन जणांना आज 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.

293 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 50, कृष्णा मेडिकल (कराड) येथील 61, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 70, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथील 30, ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथील 2, वाई येथील 5, रायगाव येथील 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर येथील 3 आणि दहिवडी येथील 22 अशा एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सातारा शहरातील रविवार पेठ क्षेत्र मायक्रो कंटेनमेंट 
सातारा शहरातील रविवार पेठ क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरिता असणारी वेळ जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील. तसेच जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.





error: Content is protected !!