लाॅकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हाॅटेल अन् पर्यटकांना दणका

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लाॅकडाऊन व जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हाॅटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला.महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातुन चांगलेच कौतुक केले जात आहे
     

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात लाॅकडाउन जाहीर केला आहे राज्य सरकारच्या आदेशा नुसार प्रत्येक जिल्हयाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत अत्यावश्यक कामासाठीच जिल्हा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे परंतु सहलीसाठी जिल्हा बंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे मुंबईच्या पर्यटकांनी लाॅकडाउन जाहीर झाल्या नंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला त्यांनी या साठी महाबळेश्वर येथील हाॅटेल लि मेरिडीयन मधील रूम आॅन लाईन बुक केल्या ठरल्या प्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्हयाच्या सिमा ओलांडुन महाबळेश्वरात दाखल झाले सायंकाळी पर्यटक येथील नाक्यावर आले असता त्यांनी हाॅटेल बुकिंग असल्याचे सांगुन शहरात प्रवेश केला ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली त्यांनी तातडीने पर्यटकांच्या शोधासाठी पथक रवाना केले या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छ शिवाजी महाराज चैकात पकडली तर इतर दोन गाडया हाॅटेलच्या प्रवेश व्दारावर पकडल्या अधिक चैकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकारी यांच्या लक्षात आले त्यांनी या बाबत पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना सर्व हकिकत सांगितली मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशा नुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार तर या पर्यटकांना हाॅटेल मध्ये प्रवेश दिल्या बद्द्ल हाॅटेल व्यवस्थापनास 25 हजार रूपये दंड आकारला या कारवाईत विशेष पथकाने 55 हजाराचा दंड वसुल केला पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे शहरातुन कौतुक केले जात आहे

error: Content is protected !!