सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रयत्न करूनही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने राज्यात कडक लाॅकडाउन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही येत्या दोन दिवसात या बाबत राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहीती जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी महाबळेश्वरचे पोलिस निरिक्षक बी ए कोंडुभैरी हे उपस्थित होते.
महाबळेश्वर पोलिस ठाण्यातील कोरोना बाधित पोलिस कर्मचारी यांची संख्या वाढू लागल्याच्या पाश्वभुमीवर सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज महाबळेश्वर पोलिस ठाण्यास भेट देवुन कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. सोमवारी दुपारी जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल हे महाबळेश्वर येथे आले. यावेळी पोलिस निरिक्षक बी ए कांेडुभैरी यांनी त्यांचे स्वागत केले. कोरोना बाधित कर्मचारी यांची माहीती देताना पो नि बी ए कोंडुभैरी यांनी सांगितले की येथील सर्वच कर्मचारी यांनी कोरीनाची लस घेतली आहे. काही पोलिस कर्मचारी यांनी आपल्याला दिसत असलेल्या लक्षणा बाबत लवकर माहीती दिली नाही तरी देखिल सर्व कर्मचारी यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
पोलिस ठाण्याची भेट झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी शहरातुन फेरफटका मारून लाॅकडाउनच्या नियमांचे महाबळेश्वरचे नागरीक किती पालन करतात. याची माहीती घेतली त्यांनी पोलिस ठाणे ते सुभाष चैक असा फेरफटका मारला या वेळी काही जीवनावश्यक वस्तुुंची दुकाने सुरू होती तेथील दुकानदारांची बन्सल यांनी भेट घेवुन त्यांचे बरोबर संवाद साधला व नियमांचे पालन करण्योच आवाहन केले.
You must be logged in to post a comment.