लॉकडाऊनला काँग्रेसचा पाठिंबा : पृथ्वीराज चव्हाण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लॉकडाऊन हा विषय राजकिय नाही, त्याच राजकारण करू नये. एखाद्या उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा विषय घेतला पाहिजे. लोकांचे जीव वाचवण्याकरिता काही उपाययोजना केल्या पाहिजेत, हा विषय पॉलिटिकली नाही. परंतु डॉक्टरानी सांगितले. टाळेबंदी केली पाहिजे, तर करावीच लागेल असे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय काँग्रेस चे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार यांच्या पोटात दुखायला लागले आहे असा आरोप भाजप आयटी सेलचे प्रमुख नवीन कुमार यांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपाचा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न चालू आहे. अजून चार वर्षे तो खेळ करायचा आहे, परंतु त्यात त्यांना यश येणार नाही. राज्य सरकारला काही होणार नाही, तीन पक्षाचे सरकार स्थिर सरकार आहे. आमच्याकडे संख्याबळ भरपूर आहे, आता कर्नाटक मॉडेल, मध्यप्रदेश मॉडेल, लोकांना पैसे देऊन फोडायचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. परंतु महाराष्ट्रात ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली नाही या प्रश्नावर मला काही कल्पना नाही. मात्र आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबरच आहेत. इतरांकडुन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस नक्कीच झाली असेल, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली

error: Content is protected !!