सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लॉकडाऊन काळातही मध्य प्रेमींनी ९२० कोटी लिटर दारू रिचवली आहे. या माध्यमातून शासनाला ११४ कोटींचा महसूल मिळाला आहे.
कोरोनामुळे अनेक व्यवसायावर विपरीत परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र दारू विक्रीवर काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश वेळा दुकाने बंद होती. मात्र तरीसुद्धा मद्यपींनी संधी साधत दारू खरेदी केली. त्यामुळे सहाजिकच शासनाच्या तिजोरीत महसूलच्या निमित्ताने भर पडली. २०१९ च्या तुलनेत २०२०२१ या वर्षात शासनाला कमी महसूल मिळाला आहे.
कोरोनामुळे बर्याचदा दुकाने बंद होती. त्यामुळे सकाळी सात ते अकरा या वेळेत घरपोच विक्रीला परवानगी देण्यात आली होती. या काळात सर्वाधिक दारू विक्री केली गेली. या घरपोच विक्रीलाही मद्यपींचा चांगला प्रतिसाद मिळाला. बियरच्या तुलनेत देशी विदेशी मद्याची जास्त विक्री झाली आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई केल्या. यातूनही शासनाला चांगला महसूल मिळाला आहे.
जिल्ह्यात २०१९-२० मध्ये दारू विक्रीतून शासनाला ६२० कोटी ७१ लाखांचा महसूल मिळाला आहे. तर २०२१ मध्ये ११४ कोटी ३७ लाखांचा महसूल मिळाला आहे. दर वर्षी उत्पादन शुल्कच्या माध्यमातून शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो.
You must be logged in to post a comment.