सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही लोक सर्रास रस्त्यावर गर्दी करीत असल्याने मंगळवारपासून दि. १ जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पोलीस प्रशासनाकडून सोमवारी रात्रीपासून कडक अंमलबजावणी सुरू केली.
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.सातारा जिल्ह्यात सरासरी प्रतिरोज 1800 ते 1900 चे पुढे कोरोना बाधित होत आहेत. त्यामुळे आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी,सातारा यांनी काढले आहेत. त्याची महसूल आणि पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस विभागाने कडक भूमिका घेतली असून लोक घराबाहेर पडणार नाहीत.विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात ज्या गांवामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गांवातील ग्रामस्थांच्या महसूल पोलीस विभागाने बैठका घेऊन बाधित लोकांना गृह विलगीकरण करावे व घरातच उपचार घ्यावेत अशा सुचना करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता प्रशासन आपले काम करीत आहे परंतू नागरिकांनी ही अशा कठीण परिस्थितीत घरी थांबून आपल्या कुंटुंबाची काळजी घेत या संकटावर मात करावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
You must be logged in to post a comment.