लॉकडाऊन… अनलॉक… शिथिलता… पण कोरोनासंकट जैसे थे !


जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू; 125 जण पॉझिटिव्ह

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात लॉकडाऊन लागू होऊन आज चार महिने पूर्ण झाले. त्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. काही काळ लॉकडाऊन शिथिल करूनही पाहिला गेला पण कोरोनाचा प्रादुर्भाव काही आटोक्यात येईना. सातारा जिल्ह्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभरात 125 पॉझिटिव्ह आढळून आले तर 5 बाधितांसह एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या 75 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.


पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कण्हेर ता. सातारा येथील 77 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष, सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वाघोली ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष, अंगापूर ता. सातारा येथील 35 वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात म्हारुल ता. महाबळेश्वर येथील 52 वर्षीय पुरुष व वाई येथील 68 वर्षीय पुरुष अशा 5  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे आगाशिवनगर ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुषाचा उपचार चालू असताना मृत्यु झाला असून कोरोना संशयित म्हणून त्यांचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आलेला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कोरेगाव :
वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 66 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 5 वर्षाची बालिका, तडवळे (समर्थ नगर) 69 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 39 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, खंडाळा :  स्टार सिटी, शिरवळ येथील 34, वर्षाचा पुरुष, 38 वर्षाची महिला, विंग शिरवळ येथील 44, 52, 25 वर्षाचा पुरुष, शिरवळ येथील 29 वर्षाची महिला, जवळे येथील 34 वर्षीय पुरुष, कुबलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, 31 वर्षीय महिला, 7 वर्षाची बालिका, कवठे येथील 8 वर्षाची बालिका, अंधोरी येथील 31 वर्षीय महिला, कराड : सैदापूर येथील 47 वर्षीय महिला, 25 वर्षाचा पुरुष, शिणोली येथील 25 वर्षाचा पुरुष, किवळ येथील 65 वर्षाचा पुरुष, 55 वर्षाची महिला, 34 महिला, 10 वर्षाचा मुलगा, 13 वर्षाची मुलगी, कालगाव येथील 28 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाची महिला, 65 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, येवती येथील 24 वर्षाचा पुरुष, शामगाव येथील 21 वर्षाचा पुरुष, 42 वर्षाची महिला, रविवार पेठ, कराड येथील 42 वर्षाचा पुरुष, मासोली येथील 30 वर्षाचा पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षाचा पुरुष, 56 वर्षाची महिला, 28 वर्षाची महिला, 8 वर्षाची बालिका, शुक्रवार पेठ, कराड 70 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 32 वर्षाची महिला, वडगाव हवेली येथील 37 वर्षाचा पुरुष, गोटे येथील 67 वर्षाचा पुरुष, कालवडे येथील 65 वर्षाची महिला, कालवडे येथील 42 वर्षाची महिला, गुरुवार पेठ, कराड 27 वर्षाची महिला, मलकापूर येथील 53 वर्षाची महिला, कालवडे येथील 6 वर्षाचा बालक, कार्वे येथील 64 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ, कराड 40 वर्षाची महिला, गोंडी येथील 40 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 6 वर्षाचा बालक, कालवडे येथील 30 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षाची महिला, 38 वर्षाची महिला, 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 65 वर्षाचा पुरुष, गुरुवार पेठ, कराड 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार पेठ, कराड 64 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, मलकापूर येथील 28 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 40 वर्षीय पुरुष, आटके येथील 59 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, 90 वर्षाचा पुरुष, 54 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, येवती येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 88 वर्षीय पुरुष, कराड येथील 45 वर्षीय पुरुष, जावली : सायगाव येथील 34 वर्षाचा पुरुष, 72 वर्षाचा पुरुष, जायगाव येथील 67 वर्षीय पुरुष दापवडी येथील 52 वर्षाची महिला, 22 वर्षाची महिला, 20 वर्षी युवक, 54 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय महिला, सायगाव येथील 56 वर्षीय महिला, माण : दहिवडी येथील 31 वर्षाचा पुरुष, खटाव :  पाचवड येथील 50 वर्षाचा पुरुष, 40 वर्षाची महिला , विसापूर येथील 45 वर्षाचा पुरुष, 50 वर्षाचा पुरुष , वडूज येथील 39 वर्षाचा पुरुष, 24 वर्षाचा पुरुष, 23 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, मासुर्णे येथील 87 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला, हिंगणे येथील 34 वर्षीय पुरुष, पाटण : आडूळ येथील 37 वर्षाचा पुरुष, सातारा : सत्वशीलनगर, सातारा येथील 72 वर्षीय महिला, भवानी पेठ, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, शेळकेवाडी येथील 40 वर्षाची महिला, 18 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, 12 वर्षाची मुलगी, 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 69 वर्षीय महिला, 76 वर्षीय पुरुष, 8 वर्षाची बालिका, फलटण : रमाबाग येथील 75 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 35 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 8 वर्षाची बालिका, महारोळे येथील 42 वर्षाची महिला, एक पुरुष, वाई : शेंदूर्जेणे येथील  30, 48 वर्षीय पुरुष, बावधन येथील 70 वर्षीय महिला, पसरणी येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

आणखी 125 जण बाधित
शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 125 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील रात्री प्राप्त होऊ शकला नाही.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
जावली :
पुनवडी येथील वय 48, 19, 50, 30, 62, 40, 10, 18, 31, 54, 56 वर्षीय महिला व वय 30, 9, 22, 20, 43, 21, 25 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष., सातारा :  खावली येथील 63 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला व 37 व 40 वर्षीय पुरुष, करंडी येथील 43 वर्षीय महिला व 61, 30 वर्षीय पुरुष,  कोडोली येथील 28, 5, 17, 38 वर्षीय महिला व 25, 15, 45 वर्षीय पुरुष,  कारंदवाडी येथील 23 वर्षीय महिला,  नागठाणे येथील 43 वर्षीय महिला,  खिंडवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 26 वर्षीय महिला., कराड :   किवळ येथील 36 वर्षीय पुरुष,  बेलावडे येथील  31 वर्षीय महिला,  चचेगाव येथील 42 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 38 वर्षीय पुरुष., वाई : परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 28 वर्षीय पुरुष, आसले येथील 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला,  बदेवाडी येथील 65, 35, 11, 40 वर्षीय महिला व 8, 25 वर्षीय पुरुष,  गंगापुरी येथील 48 वर्षीय महिला व  12 वर्षीय मुलगी, नवेचीवाडी येथील 21 वर्षीय युवक, फुलेनगर येथील 32, 26, 28 वर्षीय पुरुष व 24, 39, 50 वर्षीय महिला., खटाव : निमसोड येथील 19 वर्षीय युवती., खंडाळा : शिरवळ येथील कुंभार आळीतील 28 वर्षीय पुरुष,  बाजारपेठेतील 32 वर्षीय पुरुष,  रामोशी आळी येथील 30, 15, 17, 37 वर्षीय महिला,  ग्रामपंचायत येथील 53 वर्षीय पुरुष., पाटण :  कासाणी येथील 60 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला,  तारळे येथील 34 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, सुर्यवंशीवाडी येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

675 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 62, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 35, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 36, वाई येथील 73, शिरवळ येथील 49, रायगाव येथील 73, पानमळेवाडी येथील 146, मायणी येथील 24, महाबळेश्वर येथे 8, पाटण येथील 48, खावली येथील 30 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 675 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगरपालिका हद्दीतील करंजे पेठ, भवानी पेठ (शिवनेरी अपार्टमेंट)  तालुका हद्दीतील लिंब (सह्याद्रीनगर)  या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित केले आहे.
error: Content is protected !!