लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला 68 जणांना बाधा


दिवसभरात दोघांचा मृत्यू, 29 जण कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात उद्या शुक्रवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरू होत असतानाच लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला 68 जणांना कोरोनाची लागण झाली. आज गुरुवारी दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला तर 29 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. आता या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या घटून कोरोनाची साखळी तुटतेय का, हे पाहाणे तितकेच महत्त्वाचे ठरेल.

दोन बाधिताचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष आणि सोनगीरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष अशा दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

बुधवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
जावली:
पुनवडी येथील 56, 48, 19, 59, 24, 5, 42, 55, 13, 11, 3, 7, 5 आणि 70 वर्षीय महिला, 38, 55, 24, 22, 31, 30, 63, 27, 10, 60, 38, 34, 19, 7, 21 आणि 17 वर्षीय पुरुष, कोरेगाव : कोरेगाव येथील 54 वर्षीय महिला, एकसळ येथील 6 महिने आणि 3 वर्षीय महिला, 34 आणि 21 वर्षीय पुरुष, भाडळे येथील 50, 32 आणि 21 वर्षीय महिला, सातारा: कण्हेर येथील 30 आणि 40 वर्षीय पुरुष, करंदी येथील 43 वर्षीय महिला, 61 आणि 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 4, 17 आणि 38 वर्षीय महिला, 25, 15 आणि 45 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 53 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला, सदर बाजार येथील 56 वर्षीय पुरुष, वाई : पाचवड येथील 25 आणि 4 वर्षीय महिला, वाई येथील 40, 46 आणि 32 आणि 24 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, ओझर्डे (धोम-पुनर्वसन) येथील 57 वर्षीय पुरुष, सिधांतवाडी येथील 40 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 60, 36, 15 आणि 41 वर्षीय पुरुष, 30 आणि 7 वर्षीय महिला,  कराड : वराडे येथील 32, 17, 15 वर्षीय पुरुष, 23 आणि 35 वर्षीय महिला, मलकापुर येथील 40 वर्षीय पुरुष, कासारशिरंबे येथील 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 35 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 64 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय पुरुष डॉक्टर, खंडाळा: शिरवळ येथील 37, 55, 9, 8, 6, 30, 30, 18, 44, 49, 23, 45, 27 आणि 12 वर्षीय पुरुष, 33, 9, 24, 26, 90, 8, 19, 35, 60, 60, 41 आणि 36 वर्षीय महिला, खटाव : चितळी येथील 30 वर्षीय पुरुष, विखले येथील 27 वर्षीय पुरुष, निढळ 40 वर्षीय महिला. विसापूर येथील 13 आणि 11 वर्षीय कुमार वयीन, फलटण : गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष, मुरुम येथील 21 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष, पाटण : शहरातील 53 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 45 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 45 वर्षीय पुरुष, साईकडे येथील 19 वर्षीय पुरुष, अंबवडे खुर्द येथील 50 वर्षीय महिला, असे 119 कोरोनाबाधित आढळले.

आणखी 68 जण बाधित
गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 68 कोरोनाबाधित आढळले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2141 वर पोहोचली आहे.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
जावली:
मुनावळे येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा: कण्हेर येथील 32 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 46 वर्षीय महिला, माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, कोडोली 48 वर्षीय पुरुष, सातारा येथील 24 आणि 28 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, जिहे येथील 4 वर्षीय बालिका, कोरेगाव: चौधरीवाडी येथील 30 वर्षीय महिला, कराड: तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, लटकेवाडी येथील 42 वर्षीय महिला, मलकापुर येथील 34, 50 वर्षीय पुरुष, 30 आणि 45 वर्षीय महिला, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, शामगांव येथील 49 वर्षीय पुरुष, वाई: पसरणी येथील 44, 30 आणि 52 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, केंजळ येथील 70, 48 वर्षीय महिला, 48, 23 वर्षीय पुरुष. खंडाळा :  मर्‍याचीवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष, खटाव: राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष, अशा 29 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

473 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथील 32, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 45, स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 46, फलटण येथील 36, कोरेगांव येथील 16, वाई येथील 74, शिरवळ येथील 49, रायगाव येथील 100, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 31, खावली येथील 13 असे एकूण 473 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 

error: Content is protected !!