सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : थोपटेवाडी ता. पुरंदर येथील पेट्रोल पंपावर आरोपीने आपल्या मोटार सायकल मध्ये पेट्रोल भरून पैसा न देताच लोणंदकडे पोबारा केला. त्याचा पाठलाग करून त्यास पकडले असता त्याच्याकडे गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस व चोरीच्या पल्सर मोटार सायकलसह, चाकू आढळून आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १ रोजी दुपारी दोनच्या सुमारास थोपटेवाडी, ता. पुरंदर येथील नम्रता पेट्रोल पंपावर आरोपीने आपल्या मोटार सायकलमध्ये पेट्रोल भरले मात्र पैसा न देताच त्या ठिकाणाहूण लोणंदच्या दिशेने निघुन गेला. पंपावरील कर्मचाऱ्यांनी निरा ते लोणंद पाठलाग करून त्यास जुना फलटण रोड येथे लोणंद पोलीसांच्या ताब्यात दिले. लोणंद पोलिसांनी त्याची कसून चौकशी व अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा . दोन जिवंत काडतुस, एक चाकु आढळून आला असून त्याच्याकडे असणारी पल्सर मोटार सायक नं. एम.एच १२ केजी ३८२३ पुणे येथून चोरल्याचे नष्पन्न झाले असून अधिक तपास लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार गार्डे करीत आहेत.
You must be logged in to post a comment.