सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – खंडाळा तालुक्यात विशेषतः लोणंद व शिरवळ या ठिकाणी कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. खंडाळा तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इनसिडेंट कमांडर उपविभाग खंडाळा मनिषा आव्हाळे यांनी लोणंद व शिरवळ परिसरात ३१ मार्च पर्यंत संचार बंदीचे आदेश जारी केले आहेत.
संचार बंदीच्या काळात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व अस्थापना ठेवण्यात आल्या. दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे नागरीकांनी अत्यंत गरज असल्यास च घराबाहेर पडावे, लहान मुले व साठ वर्षावरील नागरीकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. सर्वांना मास्कचा वापर अनिवार्य केला असून मास्क न वापरणाऱ्या ना ५०० रु. दंड आकारण्यात येणार आहे. दुकानामध्ये ग्राहकामध्ये किमान ६ फुटाचे अंतर राखणे बंधनकारक असून एन्ट्री व एक्झिट पॉईंटवर थर्मल स्कॅनिंग, हॅण्ड वॉश सॅनिटायझर याची व्यवस्था करावी, अशा सुचना देण्यात आल्या असून पाच नंतर नगर पंचायत कर्मचारी व लोणंद पोलीस यांनी शहरातील व्यापारी पेठेतील दुकाने पाच नंतर बंद करावयास लावल्याने शहरात शुकशुकाट जाणवत होता.
You must be logged in to post a comment.