खंडाळा कारखान्याशी असलेला 18 वर्षाचा करार आठ दिवसात तडजोड करायला तयार : मदन भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता किसनवीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा.असे आव्हान आमदार यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधारींना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पञकार परिषेदत केले.


यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक सी.व्ही.काळे, राहुल घाडगे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, सचिन सांळुखे, प्रविण जगताप, प्रताप यादव व किसनवीर कारखान्याचे संचालक,चंद्रकांत यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.

मदन भोसले पुढे म्हणाले, नवनिर्वाचित सत्ताधारी यांना हवी ती मदत करायला तयार आहे.आम्ही शेतकऱ्यांसाठी हा कारखाना जिवाचे रान करुन उभा केला आहे.म्हणून कोणालाही याचे आॕडीट करायचा अधिकार नाही,हिशोब मागता काय,कारखाना उभारणीस का धावुन आला नाही 0 असे प्रश्न विचारण्यापेक्षा उभा केलेला कारखाना 15 दिवसात सुरु करा,यासाठी भागिदारीचा 18 वर्षाचा करार आठ दिवसात तडजोड करायला तयार आहे.

आपणास उपमुख्यमंञी अजित पवार,सहकार मंञी बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा मध्यवती बँकेची सुध्दा साथ आहे.म्हणून करार मोडायला वर्षभर लागणार नाही. सर्व मदत करायला तयार आहे. माञ स्वतःच्या जमीनी तारण ठेवणार् या संचालकांना वार् यावर सोडु नका ,अशी अपेक्षा व्यक्त केली.

खंडाळा कारखाना निवडणुकीत आलो नाही याबद्दल बोलताना श्री भोसले म्हणाले,खंडाळ्याच्या राजकारणात मी ढवळाढवळ करत नाही.तसेच मला बोलविण्यात ही आले नाही.यावर गाढवे सरांना विचारा.याबाबत शंकरराव गाढवे यांनी ही दुजोरा दिला.मोठा जिवाचा रान करुन हा कारखाना उभा केला.यासाठी खुप यातना ही सोसल्या आहेत.म्हणून माझ्या कामाचे आॕडिट करु नका,यावेळी कोणीही ईकडे फिरकले सुध्दा नाही.तरी याविषयावर बोलण्यापेक्षा हा कारखाना त्वरीत सुरु करावा.एवढीच माफक अपेक्षा मदन भोसले यांनी या पञकार परिषदेत व्यक्त केली,

error: Content is protected !!