सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विकासकर निधी कोणत्याही मंजुरीशिवाय परस्पर अन्यत्र वळविण्याच्या प्रकरणाची दखल नगराध्यक्ष माधवी कदम यांनी घेतली आहे. विकास निधीचे
एक कोटी रूपये कोठे खर्च झाले याचा वस्तुनिष्ठ खुलासा करावा, असे लेखी पत्र नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पालिकेच्या लेखाधिकारी आरती नांगरे यांनी दिले आहे. प्रशासन विरूध्द पदाधिकारी असा वाद होण्याची शक्यता असून प्रशासनाचे अधिकारी कोणत्याही धोरणात्मक निर्णयांची माहिती देत नाहीत, ही नगराध्यक्षांची जुनी तक्रार आहे. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांना खडसाविण्याचे घाडसं उशिरा का होईना नगराध्यक्षांनी दाखविले याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.
विकासकर निधी चुकीच्या पध्दतीने अन्यत्र वळविण्यात आल्याची तक्रार नगरसेवक वसंतलेवे यांनी वित्त विभागाच्या मुख्य सचिवांकडे करून सत्ताधारी आघाडीला घरचा आहेर दिला आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी सुद्धा या प्रकरणावर नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. सातारा पालिकेने नगररचना अधिनियम १९६६ च्या १२४ प्रमाणे विकास कर निधी जमीन भूसंपादन व विकसन कामांसाठीच वापरणे अनिवार्य आहे. आपत्कालीन स्थितीत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व लेखाधिकारी यांनी हा निधी विशेष परवानगीने अन्यत्र वापरण्याची मुभा आहे. पालिका कर्मचाऱ्यांचे गेल्या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी लेखापाल आरती नांगरे यांनी विकासकर निधीचे एक कोटी रूपये मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे परस्पर वर्ग केले. या प्रक्रियेत नगराध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक असताना त्यांना मात्र बाजूला ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
नगरसेवक वसंत लेवे यांच्या तक्रारअर्जानंतर या परस्पर निघी खर्चाच्या प्रकरणाला वाचा फुटली. विकासकर निधीचे एक कोटी स्पये इतरत्र वळविण्यात आल्याचा २४ तासांत खुलासा करावा, असे लेखी पत्र नगराध्यक्ष माधवी कदम यांनी लेखाधिकारी आरती नांगरे यांना दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
You must be logged in to post a comment.