सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सातारा नगरपालिकेमध्ये केलेल्या विकासकामे व सामाजिक कार्याची दखल घेत नॅशनल रुलर डेव्हलपमेंट व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेमार्फत त्यांना आंतरराज्य गौरव पुरस्काराची घोषणा केली आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा अशा तीन राज्यांमधून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, बांधकाम व इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये महनीय व कार्यकतृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक वर्षी असा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुरस्काराची घोषणा संस्थेचे कार्यवाहक माजी खासदार अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली.
या पुरस्काराचे वितरण दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी चिकोडी बेळगाव येथे होणार आहे. सौ माधवी संजोग कदम यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सातारच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, यापूर्वी त्यांना लोकमत मार्फत वुमन आयकॉन्स ऑफ सातारा या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र जनरल फाउंडेशन मार्फत भास्कर भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे.
You must be logged in to post a comment.