सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मधूमिता अभिजित वाईकर दिग्दर्शित ‘राईस प्लेट’ या विनोदी शॉर्टफ़िल्मला इंडियन स्टार इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्मचा पुरस्कार मिळाला. मधूमिता कला अकादमी संचलित अभिव्यक्त अभिनय व नृत्य शाळेतर्फे निर्माण केलेली ही शॉर्टफिल्म अभि वाईकर फिल्म्स् या यूट्युब चॅनेलवर प्रदर्शित केली आहे.
राईसप्लेट या शॉर्टफिल्ममध्ये खाद्य संस्कारातील अनावश्यक दिखाऊपणा, सोपस्कार यावर मार्मिक भाष्य केले आहे . पोटाच्या भूकेसाठी आवश्यक दोन घासांची किंमत काय असते. याबाबतचा मिश्कीलपणे संदेश ही शॉर्टफिल्म देते.
बलराम कलबुर्गी, किशोरी क्षीरसागर, ओंकार ताटे, कोमल मोरे, वनराज कुमकर, संजीव आरेकर, प्रतीक्षा जंगम, गायत्री केळकर, हिमांशू व खुशी जेबले, संजीव आरेकर व इतर कलाकारांनी यात अभिनय केला आहे. कॅमेरामन राहुल भोंडे असून संकलन तथा संगीत संयोजन आशिष पुजारी व अभिजित वाईकर यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.