सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने ( रा. राजापूर, ता. खटाव) , सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर (रा. चौधरवाडी, ता. फलटण), प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने (रा. उपळवे, ता. फलटण), महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोती चौक फलटण), किरण मदने (रा. राजापूर, ता. खटाव) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी किरण मदने याचा पोलीस शोध घेत आहेत.या टोळीतील आरोपींनी फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिल्ह्यात बारामती तालुका या पोलीस ठाणे हद्दीत अनेक गुन्हे केले आहेत.
You must be logged in to post a comment.