सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील रस्ते, मोऱ्या, संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, डांबरीकरण गटारे यांचे नुकसान झाले.
महाबळेश्वर तालुक्यात मे महीन्यात प्रारंभा पासुनच येथे पावसाला सुरूवात झाली आहे. परंतु बुधवार दि 16 जुन पासुन येथे वादळी वारे व मुसळधार पाउस सुरू झाला आहे. आज शनिवारी देखिल येथे पावसाचा जोर कायम आहे. या मुसळधार पावसा मुळे तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, दरडी प्रमाणे रस्त्यांच्या कडेला असलेले संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, लहान लहान गटारे, रस्त्यांचे डांबरीकरण यांचे ही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते तुटून दरीत कोसळले आहेत. गेली तीन दिवसात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने सार्वजनिक विभागाची चांगलीच धावपळ झाली आहे.
You must be logged in to post a comment.