जानकरांनी केला आदर्श प्रस्थापित

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माजी दुग्धविकास मंत्री आणि रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांचं निधन 31 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. आज त्यांची रक्षा विसर्जित करण्यात आली. आईची रक्षा कुठल्या नदीमध्ये नाही तर वृक्षारोपण करुन रोपाच्या बुंध्याला ही रक्षा विसर्जित करण्यात आली. त्यामुळे आईच्या रक्षा विसर्जनाच्या माध्यमातून महादेव जानकर यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

गुणाबाई जानकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर 31 मार्च रोजी माण तालुक्यातील पळसावडे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज रक्षा विसर्जन करण्यात आलं. मृतकाच्या रक्षा नदीमध्ये विसर्जित करण्याचा प्रघात आहे. पण जानकर कुटुंबाने गुणाबाई यांच्या रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता वृक्षारोपण करत, रोपाच्या बुडाला ही रक्षा अर्पण केली. या माध्यमातून महादेव जानकर यांनी नवा आदर्श निर्माण केला.

error: Content is protected !!