महाविकास आघाडीतर्फे कडकडीत महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ दि. ११ रोजी घोषित केलेल्या महाराष्ट्र बंदला सातारा जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांनी जाहीर पाठींबा दिला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा बंद कडकडीत पाळण्यात यावा असे आवाहन तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केले.

महाराष्ट्र बंद बाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निर्णयाची माहीती पत्रकारांना दिली. माने म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकरी यांचा आवाज दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. या दबावाला कोणी भिक घालत नाही हे पाहुन शेतकरी बांधवांच्या हत्याचे सत्र सुरू केले आहे लखीमपुर येथील घटना याचाच प्रत्यय देत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा 11 आक्टोंबर रोजी बंद करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!