सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात पूर्वीच्या लॉकडाऊनसारखीच अनेक बंधने घालण्यात आली आहेत. या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि प्रशासनापुढे असणार आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात पुन:श्च लाॅकडाऊन सुरू झाले असून येथे लॉकडाऊनची अनेक जिल्ह्यांत धडक अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यांच्या सीमा केल्या जात आहेत. पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरवळ, फलटण-सोलापूर, लोणंद निरा, सातारा-कोल्हापूर, सातारा-सांगली, सातारा-रत्नागिरी आदी सीमा सील करण्यात आल्या. सहा एन्ट्री पॉइंटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या लोकांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
You must be logged in to post a comment.