सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं मानाची गदा पटकावली. मात्र अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नाही, अशी खंत सोशल मिडियावर मानाची गदा पटकावणाऱ्या पृथ्वीराज पाटीलनं व्यक्त केली आहे.
64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. पण अद्याप बक्षीसाची रक्कम मिळाली नसल्यानं व्यथीत झालेल्या पृथ्वीराजनं अखेर सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र केसरी बक्षीसाची रक्कम आम्ही (संयाेजक म्हणून) द्यावी असं यजमानपद घेताना ठरलं नव्हते. आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस एकवीस लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला. त्यातून प्रशिक्षकांचे मानधन, गुणफलक अन्य तांत्रिक यंत्रणेसाठी वापरले जातात. काेट्यावधी रुपये खर्च केले अन् एकावन्न हजार रुपये द्यायला काेणतीच अडचण नव्हती असे तालीम संघचे संघटक या स्पर्धेचे संयाेजक दीपक पवार यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.