महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पत्रकारिता क्षेत्रामध्ये मुद्रित वर्तमानपत्रे, इलेक्ट्राँनिक्स चॅनेल्सबरोबर आता सोशल मिडियावरील आँनलाईन पोर्टल आणि युट्यूब चॅनेलची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सोशल मिडियाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने राज्यात महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेचा स्वतंत्र विभाग सुरू केला असून या विभागाची सातारा जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे,अशी माहिती महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदचे राज्य अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी संतोष (सनी) शिंदे,उपाध्यक्षपदी संग्राम निकाळजे, सचिवपदी पद्माकर सोळवंडे,तर खजिनदारपदी प्रशांत जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य म्हणून शरद गाडे, प्रशांत जाधव, अशोक उर्फ शक्ती भोसले , वसीम शेख, संदीप शिंदे, सतीश गायकवाड , विजय टाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठी पत्रकार परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष शरद काटकर, कोषाध्यक्ष दिपक प्रभावळकर, प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक सुजित आंबेकर ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण ,श्रीकांत कात्रे,राहुल तपासे,चंद्रसेन जाधव,तुषार भद्रे,राजेश सोळस्कर,व जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांच्या नेतृत्वाखाली ही नवनियुक्त कार्यकारिणी काम करणार आहे.
महाराष्ट्र सोशल मीडिया पत्रकार परिषदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!