सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यावेळी सातारा, कराड, वाई, पाटण, कोरेगाव, खटाव, दहिवडी आदी ठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. त्या हाकेस प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. मोदी हटाओ…देश बचाओ…, मोदी सरकारचा धिक्कार असो…, अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या (पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, शशीकांत वाईकर, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, जिल्हा उपाध्यक्ष नंदाभाऊ जाधव, सुषमा राजेघोरपडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, सचिन मोहिते, आशिष ननावरे, अनिल गुजर, निलेश मोरे, बाळासाहेब शिंदे आदींसह कार्यकर्ते सहभाग झाले होते.
You must be logged in to post a comment.