महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना आणि पक्षांच्यावतीने महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

आज 11 एप्रिल हा महात्मा जोतिबा फुले यांचा जन्मदिवस.यानिमित्त बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे क्रांतिसूर्य क्रांतीबा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सातारा शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असल्याने राज्यभर कडक निर्बंध लावले असून या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे , शहराध्यक्ष बंडू घाडगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप कांबळे, जिल्हा सचिव गणेश भिसे, दिपक धडचिरे , बाळासाहेब सावंत, वैभव गवळी, बहुजन समाज पार्टीचे सतिश गाडे, मनोहर सावंत , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (निकाळजे गट) संतोष ओव्हाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!