महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही : रामदास आठवले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाविकासआघाडी मधील घटक पक्षांमध्ये इतका वाद आहे की कदाचित अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर कदाचित शिवसेना महाविकासआघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत जाऊ शकते. मला वाटतंय की हे सरकार फार काळ टिकणार नाही. मार्च असो वा एप्रिल. सरकार लवकर जाईल अशी अपेक्षा आहे”, अशी शक्यता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले वर्तवली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, किशोर गालफाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले म्हणाले, तिन्ही कृषी कायदे केंद्रानं मागे घेतल्यानंतर देखील शेतकरी आंदोलनावर ठाम असल्यामुळे रामदास आठवले यांनी राकेश टिकैत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता तिन्ही कायदे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवं. ते होत नसेल, तर राकेश टिकैत आणि इतर नेत्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे. कायदे मागे घेतल्यानंतरही ऊठसूट आंदोलन करणं योग्य नाही. आता आंदोलनाची आवश्यकता नाही. इतर मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो”, असं आठवले म्हणाले.

error: Content is protected !!