विधिमंडळाच्या पायर्‍यांवर महेश शिंदे यांच आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सामान्य ग्राहकांच्या वीज बिलाची लूट थांबवा, शेतकऱ्यांच्या वीज तोडण्या थांबवा, महावितरणच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध अशा पाट्या घेऊन त्यांनी मूक आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. अशात एका शिवसेनेच्याच आमदाराने पुकारलेलं हे आंदोलन लक्षवेधी ठरतंय.

हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस भास्कर जाधव विरूद्ध भाजप असा रंगला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी हाती बोर्ड घेऊन असं मूक आंदोलन पुकारलं ज्याची चर्चा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही झाली.

दिवसाच्या अखेरीस ऊर्जामंत्री नितीन राऊत, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रश्नी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले

error: Content is protected !!