महिला व बाल विकास भवनाचे उदघाटन


 सातारा,(भूमीशिल्प वृत्तसेवा):  महिला व बाल विकास भवनाचे 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या हस्ते महिला व बाल विकास विभाग, 4 था मजला येथे औपचारीक उदघाटन करण्यात आले.

या उदघाटन प्रंसगी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,   अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व पशूसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती श्रीमती खाडे,  महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजनांची कार्यालये एकाच छताखाली आणल्यास लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोयीचे व्हावे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होवून नागरीकांची होणारी गैरसोय टाळता यावी याकरीता प्रत्येक जिल्हा मुख्यालय ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचे महिला व बाल विकास भवन स्थापन करणेचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. या महिला व बाल विकास भवनाची प्राथमिक सुरुवात म्हणून जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी, बाल कल्याण/जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा प्रत्येकी एका प्रतिनिधीची तात्पुरती बैठक व्यवस्था करुन दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून सदर महिला व बाल विकास भवनाचे औपचारीक उदघाटन करुन प्राथमिक सुरुवात करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आले होते.  यानुसार प्राथमिक सुरुवात करणेचे अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये महिला व बाल विकास विभाग, 4 था मजला येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा प्रत्येकी १ प्रतिनिधीची तात्पुरती बैठक व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती मनोज ससे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी कळविली आहे.  

error: Content is protected !!