किसन वीर कारखान्याच्या अध्यक्षपदी मकरंद पाटील आणि उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील तसेच उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.


किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक नुकतीच झाली हाेती. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने माजी आमदार मदन भाेसले यांच्या पॅनेलचा दारुण पराभव केला हाेता.

आज या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडी झाल्या. सर्वानुमते आमदार मकरंद पाटील आणि प्रमाेद शिंदे यांची नावे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक शशिकांत पिसाळ व संचालक मंडळाच्या उपस्थित होते

error: Content is protected !!