आ. मकरंद पाटील जलमंदिर पॅलेसवर थडकले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आ. मकरंद पाटील हे पहिल्यांदाच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवर थडकले. खा. उदयनराजेंनी त्यांना प्रेमाने पेढा भरवला.

भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंनी मकरंदआबांच्या प्रेमाखातर किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या हिताची भूमिका घेतली होती. त्याची दखल घेवून त्यांचे आभार मानण्यासाठी आ. मकरंद पाटील जलमंदिरवर गेले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी विजेत्या मकरंद पाटील यांचे जोरदार स्वागत केले. त्यांना मिठी मारली, प्रेमाने पेढा भरवला. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घकाळ चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर हेही या भेटीचे साक्षीदार ठरले.

error: Content is protected !!