ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात विज टंचाई सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लोड शेडींग सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात शेतकऱ्यांना पिकांसाठी विज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाळून चालली आहेत. होर्डींग, शॉपींग सेंटर, मॉल, शोरुम, वातानुकुलीत कार्यालयातील वीज बंद करुन शेतकऱ्यांना ती द्यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने सातारा जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार यांनी निवेदनाव्दारे थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दररोज कित्येक वॅट विज ही अनावश्यक खर्च केली जात आहे. विज टंचाई वेळी अनावश्यक खर्च होणारी विज वाचवून शेतकऱ्यांना दयावी. महानगरपालिका, नगरपालिका, महामार्ग आदी ठिकाणी अनेक कंपनीचे मोठ-मोठे जाहीरात फलक उभे आहेत. त्या फलकांवर हजारो वॅटचे बल लावुन ते रात्रभर सुरु ठेवले जात आहेत. त्याचा कोणालाही फायदा होत नाही. ती रात्री दहानंतर वीज बंद करुन शेतकऱ्यांना द्यावी. मोठ-मोठे मॉल्स, हॉटेल्स, शॉपींग सेंटर, शोरुम व कापड दुकाने येथे आवश्यकतेपेक्षा किती तरी पटीने लाईटस् लावल्या जात आहेत.

error: Content is protected !!