प्राथमिक शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्य आत्मसात होणे गरजेचे : अपर्णा पोपट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त करण्यासाठी, मुलांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी प्राथमिक शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्य आत्मसात होणे गरजेचे  असल्याचे मत ऑलिम्पियन अँड कॉमनवेल्थ मेडलिस्ट अपर्णा पोपट यांनी  शांतिनिकेतन येथे सुरु असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.           

जिल्हा परिषद सांगली व माणदेशी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी दिनांक 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी अखेर जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन शांतिनिकेतन  विद्या मंदिर सांगली या ठिकाणी करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सांगली च्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार ,मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राहुल गावडे ,जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, माजी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, माणदेशी चॅम्पियन प्रभात सिन्हा आदी पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा पार पडला.             

येणाऱ्या काही दिवसातच सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 141 शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज केल्या जाणार असून  जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण विविध खेळाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी हे क्रीडा प्रशिक्षण आयोजित केले गेले असून या प्रशिक्षणाचा लाभ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला.  जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपस्थित सर्व मान्यवरांनी सदरच्या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.         

यावेळी मानदेशी फाउंडेशनच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्रीराम बाबर ,सविता देशमुख, ओंकार गोंजारी ,कुशल भागवत ,सारंग नवाळे, समर्थ गुजरे ,मयूर लोखंडे ,दीपाली शेळके ,सचिन मेनकुदळे आदी उपस्थित  राहणार असून. या पाच दिवसीय प्रशिक्षणात  सर्व प्रकारच्या खेळांचे प्रात्यक्षिकांसह नियम आणि कौशल्य शिक्षकांना शिकवले जाणार आहेत.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राहुल गावडे यांनी केले तर आभार विस्ताराधिकारी रंगराव आठवले यांनी मानले.

error: Content is protected !!