सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ऐथ्लेटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने संगरुर पंजाब येथे घेण्यात आलेल्या १९ व्या नॅशनल फेडरेशन चॅम्पियनशिप मध्ये माणदेशी चॅम्पियन्सचे घवघवीत यश मिळवले.
संगरुर येथील वार हिरो या मैदानावर घेण्यात आलेल्या १९ व्या नॅशनल फेदरेशन कप ज्युनिअर ऐथ्लेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत माणदेशी चॅम्पियन्स ची खेळाडू आदिती बुगड हिने डिस्कस थ्रो या क्रीडा प्रकारात सुर्णपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून टाॅप 15 काॅलीफाय खेळाडू भाग घेतात. तसेच आदिती हिने जवळजवळ 47.98 मीटर लांब आतंरावरेकून नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
आदिती ही मूळची इचलकरंज येथील रहिवाशी आहे तिला लहानपणा पासूनच खेळाची आवड होती. पण तिला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे तिला खूप अडचणी येत होत्या. पण तिने माण देशी चॅम्पियन्स जॉईन केले व सरावाला सुरुवात केली. प्रशिकांच्या मते आदिती ही खूपच कष्टाळू आणि मेहनती आहे. आज सगळीकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ह्या यशाच्या मागे तिचे वडील अमित बगड अणि कोच यांचा मोठा वाटा आहे. माण देशी फाउंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा तसेच माण देशी चॅम्पियन्स चे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी आदिती व माणदेशी चॅम्पियन्स चे कोच यांचे अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.