माणदेशी फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत कोरोना लस : चेतना सिन्हा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘माणदेशी फौंडेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील २५ हजार ग्रामीण महिलांना कोरोनाची मोफत लस देण्यात येणार आहे. तर सातारा तालुक्यातील ६ हजारांवर महिलांसाठी २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा,’ असे आवाहन माणदेशी बँकेच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी केले आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिन्हा बोलत होत्या. यावेळी माणदेशी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, माणदेशी फौंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनिता शिंदे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘माणदेशी फौंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत म्हसवड, दहिवडी, वडूज आणि लोणंद शहरात ही मोहीम सुरू आहे. आता सातारा तालुक्यातील ६ हजारांवर महिलांना कोविशिल्ड लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माणदेशी फौंडेशन आणि बेल एअर हॉस्पिटलच्या माध्यमातून लस दिली जाणार आहे. साताऱ्यातील स्वराज सांस्कृतिक भवनमध्ये दि. २४ ते २७ ऑगस्टदरम्यान मोफत लस दिली जाणार आहे. यासाठी साताऱ्यात साताऱ्यात प्रथम महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे. तर लसीकरणासाठी महिलांना जाण्या-येण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सातारा तालुक्यातील महिलांनी कोरोनाच्या मोफत लसीचा फायदा घ्यावा. यासाठी माणेदशी फौंडेशन व माणदेशी महिला बँकेच्या सातारा कार्यालयात २० आॅगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळी चेतना सिन्हा यांनी केले.

error: Content is protected !!