सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या चिपळूण मध्ये पावसाची अतिवृष्टी झाल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. अशावेळी माण देशी फौंडेशनने चिपळूण मधील स्थानिक लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सुरुवातीला जवळपास १००० गरजू कुटुंबांना तत्काळ मदत पाठवण्यात आली आहे.
यामध्ये तांदूळ, मीठ, खाद्य तेल ,साखर, डाळ, चहा पावडर, साबण , हळद, जिरे,पोहे, बिस्कीट, मेणबत्ती, माचीस बॉक्स ,मच्छर अगरबत्ती, मॅगी , मिल्क पावडर , सॅनिटरी नॅपकीन, टॉवेल, , पाण्याची बॉटल, मास्क,१५०० लिटर पाण्याचे कँन्ड इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे कीट पोहोचवण्यात आले आहेत. चिपळूण येथील पुरग्रस्थाना डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रायवेट लिमिटेड यांचे सहकार्याने मदत लाभली आहे.अशी माहिती माण देशी फौंडेशन च्या मुख्य प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी दिली. अपर्णा सावंत,ज्योती जाधव, वंदना भोसले,भाग्यश्री सुर्वे व माणदेशी फौंडेशन चिपळूण शाखा येतील सर्व स्टाफ उपस्थित होता.
You must be logged in to post a comment.