सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमारे गाेरे यांच्या पॅनेलने १० जागांवर विजय मिळवत सत्ता अबाधित राखली आहे. माण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली हाेती.
या निवडणुकीसाठी एकूण ९८ टक्के मतदान झाले हाेते आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यानंतर एकेक निकाल हाती येऊ लागले हाेते. दुपारी दीड वाजता मतमाेजणी संपली. मतमाेजणी अखेर माण बाजार समितीवर भाजपच्या आमदार जयकुमार गोरे विराेधकांना वरचढ ठरल्याचे दिसत आहे. त्यांच्या पॅनेलला दहा जागा मिळाल्या आहेत. विराेधी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलेला सात जागा तर शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनेलला शून्य जागा मिळाल्या आहेत.
You must be logged in to post a comment.