सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले (वय 39, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी दि. १० रोजी दुपारी तीनच्या सुमारास लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सालपे, ता. फलटण येथील फार्म हाऊसवरून ताब्यात घेण्यात आले.
मनोहर भोसले यास दुपारी चार वाजता लोणंद पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक येळे व त्यांच्या सहकारी त्यांस बारामती येथे घेऊ गेले .
तीन दिवसापूर्वी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच अौषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
बारामतीतील शशिकांत सुभाष खऱात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा ञखाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याच अनुषंगाने फसवणूकीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास बारामती ग्रामीण पोलीस करीत आहेत.