कराड उत्तरमधून मनोज घोरपडे यांना उमेदवारी मिळावी

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांचे पक्ष बांधणीतील कार्य आणि योगदानाची दखल घेत त्यांच्या विजयाची ठाम खात्री असल्याने भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी व तळमळीने प्रभावीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून मनोजदादांच्याच उमेदवारीची एकमुखी जोरदार मागणी झाली आहे.

कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना कराड उत्तर हा मतदार संघ भाजपालाच घेवून कराड उत्तरमधुन निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. कराड उत्तरमध्ये गेली १२ वर्षे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मनोजदादा कार्यरत असून मतदारसंघात त्यांनी प्रत्येक गावांमध्ये भारतीय जनता पार्टी पोहचवण्याचे काम नियोजनबध्द व अतिशय ताकदीने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कराड उत्तर मधील अनेक प्रलंबित प्रकल्प व प्राधान्याने सिंचन प्रकल्प त्यांनी पुर्ण केले आहेत.

कराड उत्तर येथील गाव तिथे विकास काम आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मनोज घोरपडे तत्पर राहीले आहेत. प्रत्येक गावात स्थानिक जनतेला विश्वासात घेवून विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी मनोजदादा हेच सक्षम पर्याय असून त्यांच्या विजयाची भाजपा कार्यकत्यांना हमी आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण पुर्ण ताकदीने त्यांच्या सोबत पुर्ण वेळ काम करु अशी ग्वाही कराड उत्तर मधील भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली आहे.

भाजपचे समन्वयक महेशबाबा जाधव , जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, प्रमोद गायकवाड , पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, माधवराव गुरव, मंडल अध्यक्ष शंकरकाका शेजवळ, सिमा घार्गे, अंजलीताई जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत पिसाळ, अक्षय पाटील , बाजार समितीचे संचालक महेश घार्गे, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास आटोळे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक खडंग, निलेश भंडारे, दीपक हजारे, राजू सोनावणे, विकास अण्णा गायकवाड, गणेश गायकवाड, तात्यासो साबळे, आण्णासाहेब निकम, ॲड.धनाजी जाधव, गणेश जाधव, विक्रम विजापुरे, विशाल शेजवळ, सोमनाथ निकम, रणजित माने, सचिन काटे, रुक्मिणी जाधव, भुजबळ मॅडम, तुकाराम नलवडे, जितेंद्र मोरे, शहाजी मोहिते, प्रभावती सूर्यवंशी, वनिता माने, अक्षय भोसले, पायल जाधव, दत्ता साळुंखे, महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विकास अण्णा गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य दत्तात्रय साळुंखे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभाताई कांबळे, कराड उत्तर सरचिटणीस जितेंद्र मोरे, युवा मोर्चाचे सचिन जाधव, लक्ष्मण गुरव, जगदीश लावंड, महिला मोर्चा पदाधिकारी वैशाली मांढरे, वैशाली भुजबळ, यमुना जाधव, स्वाती ढाणे, नकुसा चव्हाण, कराड उत्तर युवा मोर्चाचे किरणकाका कुलकर्णी, राहुल खदंग, पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, सुहास पंडित, बाळासाहेब कंबिरे प्रशांत अनिल माने, संतोष पाटील, प्रशांत घोलप, महेश चंदुगडे, संदीप साळुंखे, बनवडी रहिमतपूर मंडलचे रणजीत माने, तुषार चव्हाण, मंडल सरचिटणीस लखन साळुंखे, शिवाजी डांगे, चिटणीस सुधीरकाका जाधव, सागर ढाणे, नेताजी भोसले, उपाध्यक्ष विजय घोरपडे, तुषार शितोळे, विजय पवार, किसान मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंतराजे शिंदे आदींनी मनोजदादांच्या विजयाची पुन्हापुन्हा खात्री देत भाजपा श्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

error: Content is protected !!